Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

युवासेना मालवण तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहिर

युवासेना मालवण तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहिर

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी नियुक्त्या केल्या जाहीर

मालवण : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी मालवण तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

मालवण कुडाळ युवासेना सह सचिव पदी अक्षय तावडे, जिप विभाग मसुरे, आचरा, आडवली-मालडी युवासेना तालुका सचिव पदी चिन्मय तांडेल, युवासेना मसुरे विभागप्रमुखपदी धनंजय परब, आचरा विभागप्रमुख पदी उमेश सावंत, आडवली-मालडी विभागप्रमुख पदी गितेश खेडेकर यांसह जिप विभाग देवबाग, पेंडूर, पोईप युवासेना तालुका संघटक पदी अमोल मुळीक, उप तालुका प्रमुख पदी संदेश वेतुरेकर, तालुका सचिव पदी तथागत मालवणकर तर जिप सुकळवाड पोईप विभाग प्रमुख पदी विशाल धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद। जय महाराष्ट्र !! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या हस्ते नवनियुक्ती पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, संकेत राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. यात माजी जिप सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर, मसुरे उपसरपंच पिंट्या गांवकर, मकरंद राणे, मंदार लुडबे, बबन परब, संदीप भोजणे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

▪️ अमित खोत मालवण

rapan bottom