Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा

भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा

उबाठा पदाधिकारी यांनी वेधले पालिका मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण : मालवण शहरात मोठया प्रमाणात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण शहर प्रवक्ता माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, मनोज मोंडकर, महेश मेस्त्री, उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, प्रदीप नाईक-साटम, बंड्या सरमळकर, आदि उपस्थित होते.

मालवण नगरपालिका प्रभारी मुख्यधिकारी श्री.निरूळकर यांची सदिच्छा भेट उबाठा पदाधिकारी यांनी घेतली व त्यांना शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले. मालवण शहरात कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. मागील दोन-तीन महिन्यात नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास जीवितास धोका निर्माण करणारा ठरत आहे.

तसेच मोकाट जनावरे यांचा त्रास वाढत आहे. मालवण शहरातील व्यापारी तसेच भाजीपाला व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. शहरात कुठेही गेले तरी मोकाट सोडलेल्या गुरांचा कळप फिरताना किंवा एका ठिकाणी ठिय्या मारलेला दिसत असतो. त्याबाबत मालवण शहरातील ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी दोन वेळा उपोषण केले होते. त्यांना तात्पुरते आश्वासन देण्या पलीकडे मालवण नगरपरिषदेने काहीही ठोस काम केलेले दिसून येत नाही.

रस्त्यावर भटके कुत्रे आणि मोकाट गुरे घाण करून दुर्गंधी पसरवतात. अस्वच्छता व आरोग्य समस्यां निर्माण होतात. सर्व बाबींचा विचार करता योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उबाठा पदाधिकारी यांनी निवेदना द्वारे केली.

ruchira top