Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी कोटींच्या निधीला मंजुरी

कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी कोटींच्या निधीला मंजुरी

6 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी ; पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी सभागृहात उठवला होता आवाज

मालवण : कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अश्या एकूण - 36 रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने एकूण 6 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

यात कुडाळ मालवण, कसाल मालवण, पणदूर घोटगे रस्ता या मुख्य रस्त्याचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे कोकणातील रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नसून कोकणात पडणारा प्रचंड पाऊस हा निकष लावून कोकणातील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ असणाऱ्या रस्त्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाजवळ केली होती. त्या नुसार कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण 36 रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 6 कोटी 95 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या मंजुरीनंतर तत्काळ निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले असून आता लवकरच निविदा प्रक्रिया होऊन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

rapan bottom