Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

माता जिजाऊ खऱ्या अर्थाने दुर्गा माता !

माता जिजाऊ खऱ्या अर्थाने दुर्गा माता !

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा अध्यक्ष मंगेश पाटील

मालवणात 'दुर्गा माता दौड' उत्साहात

राहुल जाधव | मालवण : हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. यामागे माता जिजाऊंचे मोठे योगदान होते. माता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडविले आणि शिवरायांच्या रूपाने देशाला धर्मरक्षक मिळाले. त्याकाळी जिजाऊंनी केलेला त्याग आपणास प्रकर्षाने दिसून येतो. माता जिजाऊ याच खऱ्या अर्थाने इतिहासातील दुर्गा माता आहेत. असे प्रतिपादन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हा अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.

राजमाता जिजाऊ आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी मालवण शहरात मंगळवारी 'दुर्गा माता दौड' आयोजित करण्यात आली होती. या दौडला सकाळी ८ वाजता मालवण भरड येथील भरड नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. पांढऱ्या व भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करून या दौड मध्ये हिंदू बांधव व भगिनी सहभागी झाले होते.

भरड येथून बाजारपेठ मार्गे ही दौड निघून बंदर जेटी येथे विसर्जित झाली. जय श्री राम… जय जिजाऊ… जय भवानी… जय शिवाजी… भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटात असताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून देवीकडे 'देव, देश आणि धर्माचे रक्षण' करणाऱ्या बालकाला जन्म देण्याचे साकडे घातले होते. दुर्गा मातेने जिजाऊंची ही इच्छा पूर्ण केली आणि याच कारणामुळे छत्रपती शिवरायांमुळे आपण आज हिंदू म्हणून आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करू शकतो.

मालवण शहरत भगवा ध्वजस्तंभ उभारूया व पुढच्या वेळी भव्य स्वरूपात दुर्गा माता दौड आयोजित करूया, असेही यावेळी श्री. मंगेश पाटील म्हणाले.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानचे समीर गवस, विकास गडकर, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, शिवराज मंचचे भूषण साटम, विहिंपचे जिल्हा समरसता विभाग उपाध्यक्ष संदीप बोडवे, स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत, सौ. रूपा कुडाळकर, सौ. पूजा सरकारे, विलास हडकर, शेखर मुणगेकर, अप्पा लुडबे, सुशांत तायशेटे, गणेश चव्हाण, श्रीराज बांदेकर, रवींद्र खानविलकर, अनिकेत फाटक, ललित चव्हाण, हरेश फडते, दादा वेंगुर्लेकर, ऋत्विक सामंत, समीर शिंदे, कल्पिता जोशी, अमृता फाटक, अंजना सामंत, शांती तोंडवळकर, अश्विनी आचरेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, सनातन, स्वराज्य संघटना आदी संस्थांचे सदस्य तसेच सकल हिंदू समाजातील महिला व पुरुष सहभागी झाले होते.

https://youtube.com/shorts/Zx-XrRtiBnQ?feature=share

rapan bottom