Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

परब को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ,मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची तिसऱ्यांदा निवड

परब को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ,मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची तिसऱ्यांदा निवड

मसुरे : परब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील बालविकास व्यायाम मंदिर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या सभेत सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची सलग तिसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण, उर्फ दीपक परब होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री. अनिल परब, सचिव श्रीमती प्रतीक्षा परब, खजिनदार श्री. सोमा परब, माजी अध्यक्ष श्री. अशोक परब, परब मराठा समाज मुंबईचे सरचिटणीस श्री. जी. एस. परब तसेच बाल विकास व्यायाम मंदिर हॉलचे श्री. सत्यवान परब आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष निवडीसह नवीन संचालक मंडळ निवडण्यात आले. सभासद श्री. सुनील प्रभू यांनी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांचा शाल श्रीफळ सत्कार करत अभिनंदन केले. तसेच नवीन संचालक मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब म्हणाले, परब को- ऑप. क्रेडिट सोसायटी ही सर्वसामान्यांची संस्था आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून परब समाजाबरोबर समस्त कोकणवासीयांना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. गावागावांमध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी या पतसंस्थेचे नियमित सहकार्य राहील. या सोसायटीत परब मराठा समाजातील व्यक्तींबरोबरच इतर समाजातील व्यक्तीही सभासद होऊ शकतात. या सोसायटीत १२ महिने मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर तसेच १५ महिने मुदत ठेवीवर १२ टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. परब यांनी जाहीर केले.

यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. यावेळी सौ राधिका परब, वैभववाडीहून श्री. शैलेंद्रकुमार परब, कांदळगावहून श्री. शैलेंद्र परब व श्री. गुरुदास परब तसेच वेंगुर्ल्याहून श्री. संजय परब सभेस उपस्थित राहिले. तसेच सभेला सोसायटीचे सभासद, निमंत्रित मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom