Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर

खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी

पावसामुळे खड्डे पडलेले सार्वजनिक बांधकामचे रस्ते होणार खड्डे मुक्त

कणकवली : खड्डे बुजवून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी 78 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली आणि सावंतवाडी कार्यकारी अभियंताना खड्डे बुजवण्यासाठी व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी परिपूर्ण अहवाल देण्याचे सूचना केल्या होत्या. त्या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून 23 कोटी 78 लाख रुपये इतका निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कडील रस्त्यां वरील खड्डे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर करून घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पंधरा मे पासून पाऊस सुरू झाला. साडेचार महिने सातत्याने पाऊस पडत आहे अजूनही एक महिना पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्यांची नादुरुस्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक रस्त्यावर खड्डे झालेले आहेत हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे अहवाल देण्याच्या आदेश दिले होते त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामच्या 88 रस्त्यांसाठी हा निधी प्राप्त झालेला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भरघोस असा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला खड्डे मुक्त होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.



rapan bottom