पर्यटन महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती
मालवण : जागतिक पर्यटन दिनानिमित्त तारकर्ली पर्यटन केंद्र येथे निलेश गटणे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासंदर्भात बैठक झाली. जिल्हा पर्यटन अधिकारी दीपक माने यांचीही उपस्थिती होती.
यावेळी निलेश गटणे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांचे शाल श्रीफळ संम्मान चिन्ह देऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर व टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर व पर्यटन कोअर टीम च्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी गुलदार आय एन एस नौका आशिया खंडातील पहिला आंतराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विभाग उभारत असल्याने देश विदेशी पर्यटका मध्ये वाढ होऊन जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार असल्याने उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी राज्य व केंद्र सरकारचे तसेच कर्मचारी वर्गाचे आभार मानले. तसेच हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मेहनत घेत असलेले जिल्हा पर्यटन अधिकारी दीपक माने इसदा व्यवस्थापक सुरज भोसले, धीरज चोपडेकर यांचा पर्यटन व्यवसायिकांतर्फे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
यावेळी गुलदार नौका जल पर्यटन प्रकल्प नियोजन स्थानिक व्यवसायिकांना विश्वासात घेऊन करावे असे सहदेव साळगावकर टी टी डी एस अध्यक्ष यांनी मांडले. यावेळी विष्णू मोंडकर यांनी नितीन गटणे यांना सांगितले की समृद्धी महामार्ग भूसंपादन प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये आपला मोलाचा भाग असून हा महामार्ग जसा यशस्वी वेळेत जनतेसाठी खुला झाला त्या प्रमाणे आज आपण प्रस्तावित सीवल्ड होणाऱ्या जागेची पाहणी केली त्यामुळे या प्रकल्पा विषयी आमच्या अपेक्षा वाढल्या असून समृध्धी महामार्गा प्रमाणे हाही प्रकल्प लवकर पूर्ण करावा राज्य सरकारने 2019 मध्ये झालेल्या मिटिंग मध्ये या प्रकल्पासाठी प्रति हेक्टरी 1 कोटी मंजूर केले असून आवश्यक जमीन मालकांनी जागा देण्यासंदर्भात राज्य सरकार कडे संमत्ती पत्रे दिली आहेत तरी प्रकल्प चालू करण्यासाठी जमीन भूसंपादन प्रकिया सुरु करावी तसेच जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या न्याहारी निवास धारक यांची ऑनलाईन न प्रकिया सुलभ हावी. न्याहारी निवासधारक यांना नोंदणी फी न घेता बुकिंग वर कमिशन घ्यावे 20 वर्षात एकही बुकींग निवासधारकांना पर्यटन महामंडळ कडून मिळाले नाही यात बदल व्हावा तसेच पर्यटन महामंडळाची स्वतःची निवास व्यवस्था चे बुकींग झाल्यावर निवास धारकांना बुकिंग मिळावे. कोकणातील आंबे, काजू, सुपारी शेती क्षेत्राचा विचार करता कृषी पर्यटन प्रकल्प मर्यादा 40 गुंठे वरून कमीत कमी 10 गुंठे वर आणण्यात यावी,कोकणातील नगरपालिका, नगरपंचायत्त कार्य क्षेत्रात कृषी पर्यटन प्रकल्पास मान्यता द्यावी. हॉटेल व्यवसायाला उद्योग दर्जा असल्याने वीज आकारणी ओद्योगीक दराने करण्यात यावी कोकणातील जलपर्यटन मुदत दरवर्षी 10 जून पर्यंत करण्यात यावी. कोकणातील धरण, नदी, तलाव क्षेत्रात जलपर्यटन व्यवसायास बारमाही परवानगी द्यावी. पर्यटन व्यवसाय परवानगी जिल्हास्तरावर एक खिडकी पध्धतीने देण्यात यावा. कोकणातील कातळशिल्पे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सुविधा करण्यात याव्या.
कोकणातील गड किल्ले पुनर्जीवित करून पर्यटन वाढीसाठी नियोजन करावे. कोकणातील ब वर्ग क वर्ग पर्यटन निधीतुन खर्च झालेली मंदिरे धार्मिक पर्यटन स्थळे म्हणून पर्यटकापर्यंत पोचविण्यासाठी पॉलिसी बनवावी. गोवा राज्याच्या धर्तीवर टू व्हीलर व्यवसायाला पर्यटन वाढीसाठी वाहतूक परवाना द्यावा,कोकणातील स्थानिक कल्चर ,कला,दशावतार पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी कल्चर सेंटर उभारण्यात यावे हे मुद्दे विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी मांडले तसेच यावेळी पर्यटन पूरक उभारणीसाठी अनुदान द्यावे,पर्यटन संचानालय कोकण विभागासाठी जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करावा,कोकणातील गडकिल्ले ,बीच,ऍग्रो,हिस्ट्री,कल्चर,मेडिकल,हिल,जंगल,कांदळवन सफर जलपर्यटन,साहसी पर्यटन प्रकल्प ची गाव निहाय यादी करून सरकारी वेब पोर्टल वर प्रसिद्धी द्यावी ,कोकणातील समुद्र किनारी असलेल्या सरकारी शेरे जमीन पर्यटन व्यवसायासाठी देण्याची पॉलिसी बनवावी,
कोकण पर्यटन विकास आराखडा बनविण्यात यावा.या विषयावर चर्चा झाली यावर बोलताना श्री निलेश गटणे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांनी सांगितले की या विभागाची जबाबदारी घेऊन एक दीड महिना झाला असून जिल्हातील पर्यटन प्रकल्प भूसंपादन या विषयी आढावा दौरा चालू असून सिवल्ड प्रकल्प सुरु करणे तसेच पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारत्मक आहे या सर्व विषयी मंत्रालय स्तरावर लवकरच मिटिंग घेऊन काढू असे सांगितल्याची माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली यावेळी सहदेव साळगावकर मनोज खोबरेकर रवींद्र खानविलकर केदार झाड रामा चोपडेकर अन्य पर्यटन व्यावसायिक पर्यटन खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

