Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सौ. महिमा महेश मयेकर

सौ. महिमा महेश मयेकर

यशस्वी पर्यटन उद्योजिका

🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!

आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म मात्र प्रत्येक परिस्थितीवर मात करत विविध क्षेत्रात यश संपादन केलेली अनेक स्त्री शक्ती आपण पाहतो. आपल्या आजूबाजूला ही अशी अनेक आदर्शवत आणि दिशादर्शक व्यक्तिमत्व आहेत. शून्यातून विश्व उभारणारी अश्याच एक मालवणच्या यशस्वी युवा उद्योजिका सौ. महिमा महेश मयेकर या होय…!

पूर्वाश्रमीच्या रसिता गिरकर ते यशस्वी युवा पर्यटन उद्योजिका सौ. महिमा महेश मयेकर यांचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, मेहनत आणि यशस्वी वाटचाल यांचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊनही त्यांनी पर्यटन व्यवसायात आपले स्थान निर्माण करत 'शून्यातून विश्व निर्माण' करण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

रसिता गिरकर यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल येथे झाले. आयुष्यात स्थैर्य येत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. ज्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारीचे मोठे ओझे पडले. दरम्यान च्या काळात रिक्षा व्यावसायिक महेश मयेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुरुवातीला भाड्याच्या खोलीतुन संसाराची सुरवात झाली. वाढत्या जबाबदाऱ्या आर्थिक ताळमेळ या सर्व समस्यांना महिमा (रसिता) यांनी धैर्याने तोंड दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रत्येक टप्प्यावर त्यांना त्यांचे पती महेश मयेकर यांची खंबीर साथ लाभली.

संसार सांभाळत असतानाच महिमा यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तीव्र इच्छा नेहमीच राहिली. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवून त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. पती महेश यांच्या मालकीची चिवला बीच नजीक वडिलोपार्जित जमीन होती. ही जागा मिळाल्यानंतर महिमा यांनी उद्योजिका प्रवासातील पहिले पाऊल टाकले. पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या चिवला बीचवर त्यांनी सर्वप्रथम एक छोटासा स्टॉल उभारला.

सुरुवातीला त्यांनी पर्यटकांना नाश्ता आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या व्यवसायात हळूहळू जम बसू लागला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. यशानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महिमा यांनी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी बँकेचे अर्थसहाय्य घेतले आणि पर्यटकांसाठी 'खुशी होम-स्टे' या नावाने निवास व्यवस्था उभारली. त्यांचा व्यवसाय 'हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रातील एक यशस्वी मॉडेल बनत गेला.

पती महेश मयेकर यांनीही या व्यवसायात त्यांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आपला रिक्षा व्यवसाय सांभाळतच चारचाकी वाहन खरेदी करून पर्यटनाशी जोडलेल्या व्यवसायात पुढचे पाऊल टाकले. युवा महिला उद्योजक म्हणून महिमा यांनी पर्यटन क्षेत्रात केलेल्या प्रगतीला पती महेश यांची मोलाची साथ मिळाली. 'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा भक्कम पाठिंबा असतो,' असे म्हणतात, पण महिमा यांच्या यशोगाथेत महेश मयेकर यांचा सकारात्मक पाठिंबा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. महिमा यांनी सांगितले की, पती महेश यांच्या भक्कम पाठींब्यामुळे, तसेच वडील बाळकृष्ण आणि भाऊ वैभव यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच त्यांना पर्यटन व्यवसायात हे चांगले यश संपादन करता आले.

या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आपली मुलगी खुशी हिचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले, तर मुलगा मयंक सध्या शिक्षण घेत आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि व्यवसाय सांभाळत असतानाच महिमा मयेकर राजकारणातही सक्रिय झाल्या.

गेली चार वर्षे त्या राजकीय क्षेत्रात आहेत. आपल्या मैत्रिणीच्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असताना हळूहळू त्यांना राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि त्यांचा राजकीय क्षेत्रात सक्रिय प्रवेश झाला. सध्या त्या भाजप मालवण शहर महिला चिटणीस या पदावर कार्यरत आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते, ज्यामुळे त्या एक सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात.

नवरात्रोत्सवाच्या या शुभप्रसंगी सौ. महिमा महेश मयेकर यांच्या या जिद्दीला आणि अथक परिश्रमाला सलाम! त्यांच्या भविष्यातील सर्व वाटचालीस आणि सामाजिक कार्याला अधिक यश मिळो, हीच देवी चरणी प्रार्थना!

सौ. महिमा महेश मयेकर यांच्या पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!

▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग


rapan bottom