Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जागर भजन महोत्सवचे आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात आयोजन

जागर भजन महोत्सवचे आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात आयोजन

६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भजन स्पर्धा

मंगेश नलावडे | स्काय न्युज टुडे : आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जागर भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आणि तालुका स्तरीय भजन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.

आंबेरी येथील श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिनाभरात भजन जागर महोत्सव आयोजीत करण्यात येतो. यावर्षी ७ वे वर्ष असून नावीन्य पूर्ण उपक्रम करण्याचे मंडळाच्या वतीने ठरविण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात दरोरोज रात्री ८ वाजता स्थानिक तसेच मालवण तालुक्यातील नामांकित भजन मंडळाची संगीत भजने होणार आहेत.

तर मंदिरात जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १०,०००/- व चषक, द्वितीय क्रमांकास ७,०००/-व चषक, तृतीय क्रमांकास ५,०००/-व चषक, वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ठ गायक, हार्मोनियम, पखवाज, आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
दि १८ ते १९ ऑक्टोबर दोन दिवस रात्री ८ वाजता स्थानिक तसेच तालुक्यातील संगीत भजने होणार आहेत. तर २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मालवण तालुका स्तरीय भजन स्पर्धा २०२५ होणार आहे. या साठी प्रथम पारितोषिक ७,०००/- चषक, द्वितीय ५,०००/- व चषक, तृतीय ३०००/- व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ठ गायक, हार्मोनियम, पखवाज, आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धा भजन सादरीकरण कालावधी ४५ मिनिटं चा असणार आहे, भजन मंडळात कमीत कमी १० ते १२ सदस्य असणे आवश्यक. ढोलकी किंवा इलेक्ट्रिक साहित्याचा वापर करता येणार नाही. भजन संत वाङमय वर आधारित असावीत. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी अर्धा तास आधी यायचे आहे. नाव नोंदणी साठी आणि अधिक माहिती साठी रवींद्र परब 9405497509, अमित डीचोलकर 9421672583 यांच्याशी संपर्क साधावा. तर २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत स्थानिक तसेच मालवण तालुका, आणि जिल्ह्यातील नामवंत भजनी मंडळाची भजने या जागर भजन महोत्सवात सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आंबेरी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

rapan bottom