Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सिंधू बाझारच्या शाखा मालवण तालुक्यातील महत्वाच्या बाजापेठेत सुरु करणार!

सिंधू बाझारच्या शाखा मालवण तालुक्यातील महत्वाच्या बाजापेठेत सुरु करणार!

चेअरमन राजन गावकर यांनी केले जाहीर

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा संपन्न

मालवण : व्यापार वृद्धीसाठी सिंधू बाजारचे विस्तारीकरण करताना तालुक्यातील महत्वाच्या बाजापेठेत सिंधू बाझारची शाखा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर यांनी वार्षिक सभेत जाहीर केले.

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, सरोज परब, अमृता सावंत, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संघाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच वर्षभरात जास्तीत जास्त साहित्य खरेदी करणाऱ्या दोन सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सिंधू बाझारचे मॅनेजर संदीप परब हे उत्कृष्ट काम करत असून त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी सूचना राजन भोजने यांनी केली.

प्रास्ताविकात चेअरमन राजन गावकर यांनी ग्राहकांचे समाधान, मालाचा उत्तम दर्जा विनम्र सेवा या तत्वावर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपला संघ केवळ आर्थिक नफा मिळविणे हा मुख्य उद्देश न ठेवता ग्राहकांचे समाधान, मालाचा उत्तम दर्जा विनम्र सेवा या तत्वावर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रक्रियेत आपणा सभासदांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी संस्थेस लाभत आहे. संस्था व्यवसाय वृध्दीसाठी कटिबध्द असून संस्थेच्या संचालक मंडळाने ग्राहकांच्या, सभासदांच्या सूचना व गरजेनुसार नियोजनबध्द कामकाजाचे धोरण ठरविले आहे. त्याप्रमाणे संस्थेचे स्वतंत्र खत गोडाऊन असावे यादृष्टिने संस्थेने मालवण तालुक्यातील कातवड खैदा येथे स्वतंत्र खत गोडाऊन बांधून गेल्या वर्षी कार्यान्वित केले आहे. शहरात येणाऱ्या ग्राहकांना खत घेते वेळी शहरातून खैदा कातवड येथे जावे लागत असल्याने शहरात मुख्य कार्यालयाजवळ गोडाऊन असावी अशी मागणी व्यापाराच्या दृष्टीने ही होत होती. त्याचा विचार करुन संचालक मंडळाने मुख्य कार्यालयाजवळ खत गोडावून बांधकाम चालू केलेले आहे.

संस्थेच्या नवीन सिंधुसागर या इमारतीचे बांधकाम तळमजला, ६ व्यापारी गाळे बांधून पूर्ण झाले असून २ गाळयांमध्ये संघाचा भारतगॅस विभाग चालू केला आहे. आपल्या संस्थेचा सिंधुबझार व्यवसाय प्रतिवर्षी वाढत असून गर्दीच्या हंगामात ग्राहकांना सिंधु बझार इमारतीतील जागा अपुरी पडत आहे. व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने सिंधु बझार इमारतीचे विस्तारीकरण करुन प्रशस्त बाजार सुरु करण्याचे धोरण संस्था तयार करत असून लवकर या कामाची अमंजबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठांमध्ये सिंधू बाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.

कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव असले तरी इतर नातेवाईक यांना सात बारावर नाव नसताना सभासद करण्यात येत होते. मात्र, ज्याचे सातबारावर नाव असेल त्यालाच सभासद करण्यात यावे असा शेरा ऑडिटर यांनी मारला होता. याची माहिती सभासदांना देण्यात आली. यावेळी सभासदांनी याला तीव्र विरोध केला. सातबारावर फक्त वडिलांचे नाव असते, मग त्याच्या पत्नी आणि मुलांनी काय करायचे असा सवाल उपस्थित केला. अखेर एकाचे नाव असले तरी कुटुंबातील सर्वांनाच अर्ज आल्यास पूर्वीप्रमाणे सभासद करून घ्यावे, तसा ठराव शासनाकडे पाठविण्यात यावेf असा ठराव घालण्यात आला. यावेळी सभासदांनी हात उंचावून ठरावाला मंजुरी दिली. या सभेत अशोक सावंत, राजन भोजने, आबा ढोलम, दाजी हडकर, नंदू देसाई, भगवान लुडबे, हनुमंत प्रभू, अनिलr न्हीवेकर, देवानंद लुडबे, बाबू लुडबे, दशरथ कवटकर, भाई ढोलम, विलास हडकर, संतोष गावकर, जॉन नऱ्होना, जयश्री हडकर, आदिनी चर्चेत सहभाग घेतला.

rapan bottom