Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आचरा | शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

आचरा | शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

७० शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

आचरा : शिवसेना (उबाठा) आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांच्या पुढाकारातू कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण, शिवसेना (उबाठा) आचरा विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरा पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आचरा येथील लौकिक सांस्कृतिक भवन येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन आचरा माजी सरपंच श्याम घाडी व आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे पशू वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. केशव देसाई यांनी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी किर्लोस येथेही शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र भेट घेत प्रत्यक्ष शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायचे प्रशिक्षण घेतले.

यावेळी ब्रिगेडियर डॉ. सुधीर सावंत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. शिबिरात प्रामुख्याने कोकणात पाळण्यात उपयुक्त शेळ्यांच्या जाती व उत्पादकता, शेळ्यांचे आजार, उपचार व लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, शेळ्यांसाठी घर बांधणी व शेळी घरासाठी जागेची निवड, शेळीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च, शेळ्यांसाठी चारा व वृक्ष लागवड यावर सखोल मार्गदर्शन तर कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरात परसबागेत पाळण्यात उपयुक्त कोंबड्याच्या जाती व उत्पादकता, कोंबड्यांचे आजार, उपचार व लसीकरण प्रात्यक्षिकांसह, खाद्य व पाणी व्यवस्थापन, कोंबडी घर बांधणी व कोंबडी घरासाठी जागेची निवड, पोल्ट्री फार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात ४५ शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन तर २५ शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल, माजी सरपंच मंगेश टेमकर, रामेश्वर पतसंस्थेचे संचालक श्रीकांत बागवे, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, जगदीश पांगे यांचे मार्गदर्शन लाभले. समारोपप्रसंगी विभागप्रमुख समीर लब्दे, संघटक मंगेश टेमकर, सचिन रेडकर, परेश तारी, नारायण कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन रोहन कदम यांनी केले.

rapan bottom