श्री शिवराज मंच यांच्या वतीने "नवदुर्गाच्या नवदुर्गा" या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचे मालवणात आयोजन
मालवण : श्री शिवराज मंच यांच्या वतीने "नवदुर्गाच्या नवदुर्गा" हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४ वाजता मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
कवी भूषण कथानकार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक, मोडी लिपी तज्ञ श्री. पंकजजी भोसले, शिवशंभू विचारमंच आणि सौ. ममता भोसले यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री देवी जरीमरी देवी व श्री भवानी देवी यांचा ओटी भरणे हा ऐतिहासिक कार्यक्रम नवरात्रोत्सवाच्या पाश्वभूमीवर संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या मानवंदने साठी बंदर जेटी येथे खास स्वराज्य ढोल पथक यांच्या तर्फे खास शिव मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच एस् एस् १ प्लस पथक, बिडवाडी यांच्या तर्फे ऐतिहासिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. यामध्ये अठरा मुली असून हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एक नामवंत आणि दर्जेदार कार्यक्रम आहे.४ वा. किल्ले सिंधुदुर्ग येथे देवी ओटी भरणे कार्यक्रम ४:३० वा. बंदर जेटी येथे ढोल पथक आणि मर्दानी खेळ कार्यक्रम, होणार आहेत. सर्व शिवप्रेमी मालवणवासीयांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभगी व्हावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

