Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

Shivsena | आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हडी येथील उबाठा पदाधिकारी व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena | आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हडी येथील उबाठा पदाधिकारी व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे उबाठाला धक्के सुरूच

हडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या झंजावती विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हडी जठारवाडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहे. त्यांनी विकासकामांचा झंजावात निर्माण केला आहे. याचं विकासकार्यावर प्रेरित होऊन तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश करत असल्याचे भावेश सुर्वे व सहकारी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, राजेश शेडगे, राजेश गांवकर, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, महिला उपतालुका प्रमुख पुजा तोंडवळकर, राजा तोंडवळकर, छोटू ठाकुर, मनोज हडकर, बाबू परब, राजू बिडये, सुधीर वस्त, दादा नाईक यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

▪️ प्रवेशकर्ते

हडी जठारवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा युवासेना पदाधिकारी भावेश सुर्वे यासह उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रकाश सुर्वे, सोहम कवठकर, आर्यन सुर्वे, मयूर बागवे, दिगंबर कवटकर, सुनील तोंडवळकर, रवींद्र सुर्वे, मनीष सुर्वे, महादेव परब, प्रभाकर तोंडवळकर, पराग तोंडवळकर, मनीषा वायंगणकर संचिता तोंडवळकर, नीलम वांगणकर, प्रिया तोंडवळकर, श्रीकांत तोंडवळकर, सिद्धेश गावडे, दीप्ती कवटकर, सुभाष वेंगुर्लेकर, प्रणाली तोंडवळकर विलासिनी गावडे, श्रीकृष्ण गावडे, दिया सुर्वे, दीपक सुर्वे कविता गावडे यासह ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom