मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध सेवा उपक्रम सर्वत्र राबवण्यात आले. मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून धुरीवडा रेवतळे प्रभागातील नेत्र रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेली १८ वर्ष मंदार केणी नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून अश्या प्रकारे अनेक सेवा अविरत पणे करून देत आहेत. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात मंदार केणी सहभागी होत असतात.


