Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला मोठे यश | देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला मोठे यश | देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून मान्यता

कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय

कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन

सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज, दीडशे कोटीचा प्रस्ताव

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याचा सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहेत.
या संदर्भात 26 ऑगस्ट रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये नवीन शासनमान्य विद्यालय यांना मान्यता देऊ नये असा धोरणात्मक निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र नामदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये मत्स्य विद्यालय करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता गरजेची होती. ही मान्यता मिळाली असून मत्स्य विद्यालय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार असून,देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे पारंपारिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

देवगड सारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय मिळणार आहे.

rapan bottom