मालवण : ग्रामपंचायत कुंभारमाठ व प्राथमिक आरोग्य केंद्र चौके यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जानकी हॉल कुंभारमाठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. कुंभारमाठ सरपंच सौ.पुनम मनोज वाटेगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, सदस्य प्रमोद भोगावकर, सौ. अनिता गावकर, प्रिया गोवेकर, दिव्या मिसाळ, आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड, आशा सेविका प्रणिता भोगावकर, आशासेविका अश्विनी नेवाळे, डॉक्टर तसेच आरोग्य विभाग कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबीरामध्ये नेत्र तपासणी, बीपी शुगर तपासणी, रक्त तपासणी, CBC,Sugar, Lft लिव्हर फंक्शन टेस्ट, Kft किडनी फंक्शन टेस्ट, Hba1c मागील तीन महिन्यातील रक्तातील साखर पातळी, Thyroid थायरॉईड, छातीचा X-ray, टेली मेडिसिन सल्ला तज्ञ डॉक्टर मुंबई, पुणे, हृदय रोग तपासणी, ECG, Lipid profile रक्ताची तपासणी, जनरल चेकअप या तपासण्या करण्यात आल्या. तसेच आयुष्यमान कार्ड काढणेत आले.

१२५ ग्रामस्थांनी सदर शिबीराचा लाभ घेतला. तसेच यावेळी औषधांचे वाटप ग्रामपंचायत कुंभारमाठ यांच्यावतीने मोफत करण्यात आले. सदर शिबीरासाठी कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या सामुहिक कार्यक्रमांना नेहमीच सहकार्य करणारे जानकी हॉलचे मालक विनय गावकर यांनी विनामोबदला हॉल उपलब्ध करुन दिला.

