Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

काळसे सिद्धमहापुरुष मठात घटस्थापना..!

काळसे सिद्धमहापुरुष मठात घटस्थापना..!

चौके : मालवण तालुक्यातील काळसे गावातील नवसाला पावणाऱ्या गोसावीवाडी श्री सिद्धमहापुरुष मठामध्ये प्रतिवर्षिप्रमाणे यावर्षीही पारंपारीक प्रथेप्रमाणे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी गावकरी, मानकरी तसेच गोसावी वाडीतील रहिवासी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त मठामध्ये दररोज रात्रौ स्थानिक भजन मंडळाचे सुस्वर भजन, त्यानंतर गरबा व दांडिया नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
प्रथेप्रमाणे घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवसा पासून गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले देवाचे पवित्र आणि नवसाला पावणारे पतीर गावामध्ये घरोघरी फिरविले जात आहे.
या उत्सवाचा महत्वाचा भाग असलेला श्री देव सिद्धमहापुरुषाचा वार्षिक भंडारा उत्सव मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने सकाळी ८:०० श्री सिद्धमहापुरुष पाषाणाचे विधिवत पूजन, सायं. ५:०० वाजता मुख्य आणि सार्वजनिक गाऱ्हाणे, त्यानंतर नवस बोलणे नवस फेडणे हे कार्यक्रम आयोजित केले आहेत, रात्रौ १०:०० वाजता श्री सिद्ध महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे सुस्वर भजन, १०:३० वाजता महाआरती आणि रात्रौ ११:०० वाजता देवाला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना प्रसाद वाटप आणि रात्रौ उशिरा गावातील राऊळ यांचे गाऱ्हाणे होऊन या उत्सावाचा समारोप होणार आहे. अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या भंडारा उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्ध महापुरुष उत्कर्ष मंडळ गोसावीवाडी, काळसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom