ग्रामपंचायत किर्लोस मार्फत स्वच्छता मोहीम
मालवण | प्रतिनिधी : स्वच्छता सेवा २०२५ अंतर्गत महाश्रमदान
ग्रामपंचायत किर्लोस मार्फत राबवण्यात आले. धार्मिक स्थळे, शाळा परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली.
यावेळी सरपंच साक्षी चव्हाण, ग्रा. प. सदस्य प्रवीण घाडीगांवकर, ग्रामपंचायत अधिकारी घाडी, ग्रा. प. कर्मचारी, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आशा सेविका समिक्षा लाड, अंगणवाडी सेविका भावे, अर्जुन लाड, गोपीनाथ लाड, दिलीप घाडीगांवकर, सुदाम घाडीगांवकर, श्रीधर गावडे, पोलिस पाटील किशोर लाड, समिर लाड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

