Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मटका जुगारावर धाड…

मटका जुगारावर धाड…

मालवण पोलिसांची कारवाई ; सुमारे ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

मालवण : मालवण शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मालवण पोलिसांनी धाड टाकून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर मटका जुगार घेत असताना एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत संशयिताकडून ३१ हजार ५७० किमतीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई रात्री करण्यात आली.

या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर (वय ५१, रा. धुरीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष व बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी खोबरेकर याच्याकडून एक मोबाईल, एक प्रिंटर, रोख रक्कम, एक स्कॅनर आणि आकडेमोड करण्यात आलेल्या पावत्या असा एकूण ३१ हजार ५७० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपअधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलीस अधिकारी श्री. आव्हाड आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, जितेंद्र पेडणेकर, सुशांत पवार, महादेव घागरे, गुरुनाथ परब, मनोज कांबळे या पोलीस कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जे. एस. कुडाळकर हे करत आहेत.

rapan bottom