Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा; तलावांचे सर्वेक्षण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश

मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा; तलावांचे सर्वेक्षण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मच्छीमारांचे मोठे नुकसान

मंत्रालयात बैठकीत सविस्तर सर्वेक्षणाचे आदेश

सर्व तलावांचा गाळ तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना

गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरच राबवण्याचा निर्णय

पुढील वर्षी ओव्हरफ्लोचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व तलावांचे सर्वेक्षण करून गाळ किती साचला आहे, याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.गाळ काढण्याचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत राबवण्याचे प्रयत्न सुरू असून, पुढील वर्षी पुन्हा गाळ साचल्याने तलाव ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom