Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्रकाश विठोबा कानूरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

प्रकाश विठोबा कानूरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मान

राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश कानूरकर यांना सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम 1 लाख 10 हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे य पुरस्काराचे स्वरूप आहे.

शिक्षक श्री. प्रकाश कानूरकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ, सिंधुदुर्ग सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रसारक म्हणून राज्यस्तरीय वेध परिवार सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. श्री. कानूरकर यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा समाजकल्याण संचनालय पुणे मार्फत व्यसनमुक्ती अभियान राबवल्याबद्दल युवा गौरव पुरस्कार, ज्ञानदीप मंडळ सावंतवाडी मार्फत ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्लोबल वेलफेअर फौंडेशन, (GMC, INDIA) मार्फत " नॅशनल एज्यूकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड, नॅशनल रूरल डेव्हलोपमेंट फौंडेशन, बेळगांवी मार्फत राष्ट्रीय आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार, माधवनगरच्या भ. रा. नाईक प्रतिष्ठान पुणे मार्फत शिक्षण व्रती पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री. कानूरकर यांना जाहीर झाला आहे,

कानूरकर यांच्या या यशाबद्दल
संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर , संचालक मंडळातील इतर पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे , पर्यवेक्षक महेश भाट आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यासोबत संस्थेच्या माजी अध्यक्ष डॉ. व्ही सी वराडकर व माजी संचालक यांनीही कानूरकर सर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करून प्रकाश विठोबा कानूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

rapan bottom