Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

'स्वस्थ नारी, सशक्त नारी'अभियानांतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

'स्वस्थ नारी, सशक्त नारी'अभियानांतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

ग्रामीण रुग्णालय मालवण आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण : 'स्वस्थ नारी, सशक्त नारी' या अभियानाचा एक भाग म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.


नवरात्रोत्सवात आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता सौ शिल्पा यतीन खोत आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे, अधिपरिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले, रक्तपेढी सहायक ऋतुजा हरमलकर, परिचर विजय निरुखेकर, प्रथमेश घाडी, नितीन गावकर, दादा वेंगुर्लेकर, सुभाष कुमठेकर, मानसी घाडीगावकर, शांती तोंडवळकर, स्वप्नील परुळेकर यांच्यासह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा खोत यांनी यावेळी "रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रक्तदान करून या पवित्र उत्सवाची सुरुवात करणे, ही एक विशेष बाब आहे," असे सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

rapan bottom