भजन, डबलबारी, कीर्तन क्षेत्रातील अष्टपैलू कलारत्न
💐 नवदुर्गा : पुष्प तिसरे 💐

सौ. योगिता नंदकीशोर पवार
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कला क्षेत्रातही महिला कलावंत यांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. भजन, डबलबारी, कीर्तन क्षेत्रात आपला ठसा ठळकपणे उमटवणाऱ्या कुडाळ वर्दे उंचवळावाडी येथील सौ. योगिता नंदकीशोर पवार या होय. गेली दोन दशके त्या कलेची सेवा करतं असून भजन, डबलबारी, कीर्तन या तीनही क्षेत्रात स्त्री शक्तीचा ठसा उमटविला आहे.

भजन ही आपली कला संस्कृती आहे, ती जपली पाहिजे. भजन क्षेत्रात नवीन बदल होत असताना "भजन" या शब्दाचा अर्थ समजून भजनी बुवां परंपरा आणि त्यातली पारंपारिकता टिकवून ठेवण्याचे काम करत आहेत. या भजन कलेतील भजन, डबलबारी, कीर्तन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या कुडाळ तालुक्यातील वर्दे उंचवळावाडी येथील महिला भजनी बुवा सौ. योगिता नंदकीशोर पवार या भजन, डबलबारी, कीर्तन अशा तिहेरे कलाप्रकारात श्रोत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
सौ. योगिता पवार यांचे माहेर इळये पाटथर (गगनगिरी आश्रम) ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथील. पूर्वाश्रमीच्या योगिता राजाराम परब यांनी सुमधुर आवाजाने अल्पावधीतच श्रोत्यांची वाहवा मिळवून भजन क्षेत्रात नावलौकिक मिळविले. भजन क्षेत्रात गुरुवर्य म्हणून देवगड दाभोळ येथील श्री प्रभाकर धुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
सौ. योगिता पवार यांनी 2002 साली संगीत भजन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. 2003 मध्ये त्यानी डबलबारी सामने करण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्गातील पेटी वाजवून डबलबारी करणारी पहीली महिला भजनी बुवा अशी एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
आपल्या कलेचा कधीही मोठेपणा न मिरवता दोन दशके त्या कलेची सेवा करतं आहेत. संगीत भजन सोबत पारंपरिक डबलबारी सामने, नव्या ट्रेंड प्रमाणे 20-20 भजन सामने, भजन स्पर्धा, यामधून त्यांनी नावलौकिक मिळवला.


मुंबई, रायगड, प्रतापगड, रत्नागिरी, राजापुर, सिंधुदुर्ग येथे डबलबारी सामने केले. थोडक्यात मुंबई ते गोव्याच्या पर्यंत डबलबारी भजनाचे कार्यक्रम केले. पहिली डबलबारी रत्नागिरी येथे झाली. महिला भजनी बुवा संजिवनी वाघे, मंगला चव्हाण, रुतुजा पाळेकर, आरती घाडी, आरती मोहीते, पुजा गुरव, आरती पाळेकर, भारती पाळेकर, वीणाश्री पाळेकर, साची मुळम, प्रणाली अनभवने, रिया मेस्री, शशिकला अळवणी,ज्योती पुजारे, भारती मढवी, दिप्ती वारीक, स्वराली नाटेकर यासह अन्य महिला भजनी बुवा सोबत डबलबारी भजनचे सामने केले.
2008 मध्ये जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ कुणकेश्वर खालचीवाडी यांनी राबविलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक, 2007 श्री ब्राह्मण देव प्रा. भजन मंडळ बापर्डे, नाईक धुरीवाडी प्रथम क्रमांक तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणुन क्रमांक मिळवला.
भजन क्षेत्रा सोबतच त्या उत्कृष्ट महिला कीर्तनकार म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. कीर्तन क्षेत्रात त्यांनी विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालय आकेरी गुरुवर्य ह.भ.प.श्रीराम झारापकर यांच्याकडे शिक्षण घेत "कीर्तन विशारद" ही पदवी मिळवली आहे. तर शास्त्रीय संगीतात राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग गुरुवार्या सौ. वीणा हेमंत दळवी यांच्याकडे गायन विशारद प्रथमचा अभ्यास त्याचा सुरू आहे. भजन कीर्तन, डबलबारी या क्षेत्रात बरंच काही शिकण्यासारख आहे. मात्र ते पण तल्लक बुद्धी आणि जिद्दीने आत्मसात केलं पाहिजे असे त्या सांगतात.

योगिता परब यांचा विवाह कुडाळ वर्दे उंचवळावाडी येथील श्री नंदकिशोर पवार यांच्या सोबत झाला. त्यांचे पती हे देखील उत्कृष्ट असे लोकप्रिय भजनी बुवा आहेत. त्यांना सुप्रसिद्ध भजनी बुवा नारायण वाळवे यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. योगिता या कुडाळ मध्ये श्री देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे यांच्या माध्यमातून भजन सेवा करत आहेत. उत्कृष्ट गायक, हार्मोनिम वादक आणि, उत्कृष्ट कीर्तनकार अशी अष्टपैलू ओळख आहे. आपल्या कला अदाकरीने रसिकांची मने जिंकली आहेत. आपल्या आई वडील, बहिणी यांची मोलाची साथ मिळाली त्यामुळे भजन क्षेत्रात आपली वाटचाल सुलभ पणे चालू झाली. आता आपल्या सासरी ही स्वतः आपले पती भजन सेवेत असल्याने त्याचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामूळे भजन, कीर्तन क्षेत्रात मोठ्या उत्साहाने परमेश्वरा ची सेवा करत आहे.
दोन मुली असून त्याना ही भजन कीर्तन क्षेत्राची ओढ निर्माण झाली आहे. त्या दोघी ही आपल्या सोबत या क्षेत्रात असतात माझ्या मुलीं कु. निधी नंदकिशोर पवार (वय 14) ही कीर्तन, पेटी, पखवाज चे शिक्षण घेत आहे तर मला भजन मध्ये कोरस म्हणून साथ देते. तर काव्या नंदकिशोर पवार (वय 11) ही कीर्तन, गायन, तबला, याचे शिक्षण घेत आहे. भजनात ती झांज वादक म्हणून साथ करते. आतापर्यंत तीने उत्कृष्ट झांज वादक म्हणून 8 ते 10 बक्षिसे मिळविली आहेत.

भजन कीर्तन, यांच्या माध्यमातून समज प्रबोधन करून परमेश्वर सेवेचा एक वेगळा आनंद मिळतो. भावी पिढी ने देखील अश्या अध्यात्मिक क्षेत्रा कडे वळून शास्त्रोक्त शिक्षण घेऊन आपलं करियर घडविले पाहिजे. संगीत क्षेत्रात विविध पदवी संपादन करता ययेतात. याकडे लक्ष देऊन आपली प्रगती व समाजात एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली पाहिजे असेही त्या सांगतात.
सौ. योगिता पवार यांच्या कर्तुत्वाला आणि पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

