Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मसुरे विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता..!

मसुरे विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता..!

मसुरे | : मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. गेले आठ दिवस मंदिर परिसर हरिनामात रंगून गेला होता. "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला"असा जयघोष आणि मंदिर परिसरात केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसर झळाळून गेला होता. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील भजनी मेळ्या सह त्रिंबक, चिंदर, मालोड, बेलाचिवाडी, बांदिवडे, आडवली येथील भजनी मेळ्यानी आपली सेवा दिली.

मसुरे टोकळवाडी मंडळाच्या गोफ नृत्याने रंगत आणली. हरिनाम सप्ताहात अखेरच्या दोन दिवसात सादर करण्यात आलेल्या दिंड्या मुख्य आकर्षण ठरल्या. मसुरे टोकळवाडी मंडळाचा "पंचमुखी हनुमान" मसुरे मर्डेवाडी मंडळाचा "मत्स्य अवतार" आणि मसुरे गडघेरावाडी मंडळाचा "संत साई बाबा" आदी देखावे साकारण्यात आले. हरिनाम सप्ताहात सादर केलेल्या देखाव्या सोबत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

rapan bottom