27 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा
29 सप्टेंबर रोजी आमने सामने डबलबारी (20-20)
मालवण : मालवण तालुक्यातील किर्लोस येथील श्री रामेश्वर, पावणा देवी, गांगेश्वर प्रासादिक दिंडी भजन मंडळ किर्लोस आणि ग्रामस्थ यांच्या वतीने श्री पावणादेवी मंदिरात नवरात्रो उत्सवा निमित्त 27 सप्टेंबेर रोजी जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा 2025 चे आयोजिन करण्यात आले आहे.
यात पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवे बुवा श्री प्रथमेश मोर्ये, दुपारी 3 ते 4, काशिकलेश्वर प्रासादिक भजन मंडळ कलमाठ, बुवा श्री चेतन गुरव, सायंकाळी 4 ते 5, ब्राम्हण देव प्रासादिक महिला भजन मंडळ पवाशी, बुवा सौ. प्रियंका तवटे, सायंकाळी 5 ते 6 , श्री गांगेश्वर कृपा भजन मंडळ, श्रावण बुवा श्री विश्राम घाडी, सायंकाळी 6 ते 7, श्री दीर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली बुवा श्री अवधूत मेस्त्री, सायंकाळी 7 ते 8 श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पाईप, बुवा श्री ओमकार येरम रात्री 9 ते 10,श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठीवडे, बुवाश्री अक्षय परूळेकर, रात्री 10 ते 11, असे जिल्हा स्तरीय भजन स्पर्धे चे कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रात्र 8 वाजता 20-20 डबलबारी चा सामना होणार आहे. यात बुवा श्री अरुण घाडी, श्रीदेवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी कुडाळ गुरुवर्य प्रदीप पांचाळ पखवाज विनीत धुरी तबला जितेश परब, प्रतिस्पर्धी बुवा श्री सुशील गोठणकर, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ गुरुवर्य कै. काशीराम परब पखवाज विनोद मांडवकर तबला योगेश गोठणकर यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर, पावणादेवी, गांगेश्वर प्रासादिक दिंडी भजन मंडळ किर्लोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

