वीज वाहिनी योग्य उंचीवर नेण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी
भाजपा मालवण तालुकाउपाध्यक्ष संमेश परब यांनी वेधले वीज वितरणचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी : दांडी पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या सागरी मार्गात उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. ही वाहिनी खाली आली असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी ही वीज वाहिनी योग्य उंचीवर न्यावी. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा मालवण तालुकाउपाध्यक्ष संमेश परब यांनी वीज वितरणकडे केली आहे.
काही वर्षा पूर्वी याठिकाणी वीज वाहिनीचा स्पर्श झाल्यामुळे अपघात घडला होता. या मार्गावर पाण्यातून मच्छिमार बोटी, पर्यटन व्यावसायिक बोटी यांची वाहतूक असते. तरी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी संमेश परब यांनी केली आहे.

