भजन डबलबारी क्षेत्रातील 'कलारत्न'
💐 नवदुर्गा : पुष्प दुसरे 💐

कु. अंकिता शिवराम गावडे
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कला क्षेत्रातही महिला कलावंत यांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. भजन डबलबारी क्षेत्रात आपला ठसा ठळकपणे उमटवणारी मालवण तालुक्यातील साळेल गावची सुकन्या कु. अंकिता शिवराम गावडे या होय. महिला डबलबारी बुवा म्हणून आपली विशेष ओळख ठळकपणे निर्माण केली असून या क्षेत्रात स्त्री शक्तीचा ठसा उमटविला आहे.

भजन म्हणजे थेट परमेश्वरच्या चरणा पर्यत जाण्याचा मार्ग आहे. कलियुगात नवविध भक्ति मध्ये भजन हे श्रेष्ठ आहे. आज भजन क्षेत्रात पुरुष भजनी बुवांच्या तोडीस महिला भजनी बुवा मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे वळलेल्या दिसून येत आहेत. अशीच एक मालवण तालुक्यातील साळेल गावची सुकन्या कु. अंकिता शिवराम गावडे सध्या भजन डबलबारी क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहे.
घरात भजनाचा वारसा नाही मात्र शून्यातून विश्व निर्माण करण्याची उमेद मनात ठेऊन भजन सेवेतून परमेश्वराचे नामस्मरण करत आहे. गोड गळ्याच्या सुमधुर आवाजाने भजन रसिक ही मंत्र मुग्ध होतात. अश्या या महिला भजनी बुवा अंकिता गावडे हिच्या भजन क्षेत्राची सुरुवात अष्टविनायक महिला प्रासादिक भजन मंडळाने झाली.


सुरुवातीला गावातील पुरुष मंडळी ना घेऊन भजन सेवेला सुरुवात केली. हळूहळू गावातील युवा तरुणी, महिला वर्ग या भजन मध्ये सामील झाले. अपार मेहनत जिद्द आणि रियाज करून संगीत भजना सोबतच महिला डबल बारी बुवा म्हणून लोकांच्या पसंतीस उतरली.
भजन क्षेत्राचे ज्ञानचे धडे तीने कुडाळ वर्दे येथील सुप्रसिद्ध बुवा विजय (गुंडू) सावंत यांच्या कडून घेतले. घरातील आजी, आई, वडील, भाऊ, बहीण यांची ही तिला मोलाची साथ लाभली. भजन क्षेत्रात नावलौकिक मिळताना आपले संस्कर आणि शिकवण कायम ध्यानात ठेवून काही झाल तरी या क्षेत्रात मोठेपणा न करता आपले पाय जमिनीवर ठेऊन आपली भजन सेवा चालू ठेवावी ही गुरूवर्य गुंडू सावंत बुवा आणि आपले आई वडील यांची शिकवण कायम ध्यानात ठेऊन आपले भजन परमेश्वरचे नामस्मरण चालू ठेवणार असे कु.अंकिता सांगतात.
समाज प्रबोध करताना पुराण, रामायण ग्रंथ, महाभारत, महाकाव्य वाचनाची आवड निर्माण झाली. यातून समाज प्रबोधन आध्यात्मिक ज्ञान वाढत गेल्याचे त्या सांगतात.

मालवण चौके हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन महाविद्यालयीन अकरावी, बारावीचे शिक्षण मालवण टोपीवाला हायस्कूल मध्ये झाले. तर कुडाळ येथील एसआरएम कॉलेज मधून बिझनेस मेनेजमेंट मध्ये ग्रेजुएशन केल आहे. भजन क्षेत्राने समाजात मला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. भजन रसिकांचे प्रेम आपुलकी आणि वडीलधाऱ्या माणसाचे आशीर्वाद मिळतात तेव्हा खूप काही मिळविल्या सारख समाधान वाटत असेही अंकिता सांगतात.
डबल बारी क्षेत्रात मालवण तालुक्यात एकमेव महिला डबलबारी भजनी बुवा म्हणून लोकांची पसंती मिळत आहे. याचे समाधान वाटते. गुरूवर्य गुंडू सावंत बुवा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यामुळे डबलबारी क्षेत्रात नाव मिळविता आले. त्यातच आई वडिलांचा खंबीर पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन प्रेरणादायी ठरला.


अवघ्या २ वर्षात डबलबारी करण्यास सुरुवात केली. रसिकांची पसंती आणि एक महिला भजनी बुवा म्हणून जनतेने मला समाजात चांगला मानसन्मा दिला. या क्षेत्रात ७० ते ८० डबल बारी सामने आता पर्यंत केले आहेत. यात वेंगुर्ला, दोंडामार्ग, मालवण, कुडळ, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, देवगड, मुंबई जोगेश्वरी येथील " जय जवान गोविंद पथक या सारख्या मोठ्या मंडळाने डबलबारी करण्याची संधी दिली यात खूप काही जिंकल्या सारख वाटलं.२०२१ मध्ये भज जन स्पर्धेत प्रेक्षक पसंती प्रथम क्रमांक मिळाला. आपणाला अजून भजन क्षेत्रात खूप शिकायच आहे असे अंकिता नम्रपणे सांगतात.
अंकिता यांच्या या कर्तुत्वाला आणि पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

