Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कनिष्ठ अभियंता सुरज गिरी यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

कनिष्ठ अभियंता सुरज गिरी यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

सा. बां.मालवण उपविभाग कार्यालयात कार्यरत

मालवण | प्रतिनिधी : आद्यअभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी भारतात राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो. अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील राज्यातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वैयक्तिक पुरस्काराने गौरविण्यात येते. सावंतवाडी सा. बां. विभाग मधील मालवण उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, श्री. सुरज धनराज गिरी यांना तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) या विभागातून पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ठ असलेल्या संवेदनशील कामावर पूर्ण वेळ उपस्थित राहून बांधकामावर देखरेख ठेवण्याचे काम केले. यामध्ये रात्रीसुध्दा काम चालू असताना ते विना अडचण व सुरळीतपणे चालू राहण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांबरोबर समन्वय साधून प्रयत्न केला.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सिंधुदुर्गनगरी या उपविभागातील दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडील २००५ पासून ते २०१९ पर्यंत ऑफलाईन प्रलंबित असलेले एकूण ३५ निरीक्षण ज्ञापन बंद केले. त्याबद्दल मा. अधीक्षक अभियंता यांचेकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करण्यात येते. इमारती रस्ते पूलांची संकल्पना तयार करून संगणकाच्या द्वारे संकल्पचित्र बनवताना तसेच सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना आणि प्रकल्प राबवताना अभियंत्यांचे तांत्रिक कौशल्यपणास लागते. अशा कल्पक अभियंत्यांची सेवा समाजाला फायद्याची ठरते. त्यामुळे राज्य शासनाकडून अशा अभियंत्यांना अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानित करण्यात येते. श्री. सुरज धनराज गिरी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

rapan bottom