नलावडे कुटुंबियांची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात धार्मिक संस्कृतीक कार्यक्रम
मालवण | : मालवण कांदळगाव कातवड येथील नलावडे कुटुंबियांची कुलदैवत कुलस्वामिनी श्री देवी भवानी माता मंदीरात नवरात्रौत्सवा निमित्त दि 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक संस्कृतीक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यात दररोज सकाळी कुलस्वामिनी भवानी देवीची विधीवत पूजा होणार आहे.

आज नवरात्री च्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीच्या घटाची विधिवत पूजा कारण्यात आली. पहिली माळ देवी चरणी अर्पण करण्यात आली. मंदिरात नवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम भजन आणि रात्रौ गरबा नृत्य सादर केलं जाणार आहे.तर रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी मंदिरात होम हवन कार्यक्रम, महाप्रसाद,ओटी भरणे, हळद कुंकू आधी कार्यक्रम होणार आहेत. भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नलावडे कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात येत आहे.


