Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

विरण नवदुर्गा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सव

विरण नवदुर्गा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सव

विविध धार्मिक वं सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

विरण | सुरेश घाडीगांवकर : दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विरण आयोजित भव्य नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू झाला असून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विरण बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथे हा नवरात्र उत्सव गेली अनेक वर्षे नवदुर्गा कला क्रीडा, सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन व अनिल भाई कांदळकर, रामदास भाई पांजरी, विलास पांजरी, दत्ताराम आंबेरकर यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सुरु आहे. या नवरात्रोत्सवासाठी भव्य मंडप, डेकोरेशन, रंगमंच, आकर्षक विद्युत रोषणाई, सुमधुर साउंड सिस्टीम व आई नवदुर्गा देवीची मन प्रसन्न करणारी विलोभनीय मूर्ती हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. तरी या संपूर्ण नवरात्र उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरदिवशी दुर्गा देवीची पूजा, आरती प्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची सुस्वर भजने, त्या नंतर गरबा, दांडीया तर भाविक आणि रसिकांच्या मनोरंजनासाठी २२ सप्टेंबर रोजी रात्री होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे राकेश नेमळेकर.

२४ सप्टेंबर रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, २७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता वेशभूषा स्पर्धा, २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता सम ई नृत्य, २९ सप्टेंबर रोजी ओमकार डान्स अकॅडमी सावंत वाडी यांचा कलाविष्कार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता देवीचा महाप्रसाद, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स, रात्री ९ वाजता १०० बक्षिसांच्या लकी ड्रॉ ची‌ सोडत व २ ऑक्टोबर २५ रोजी सायंकाळी ५ वाजता देवीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या संपूर्ण नवरात्र उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom