Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

२ ऑक्टोंबर रोजी कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

२ ऑक्टोंबर रोजी कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

मालवण | : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १०:३० वाजता धम्म ध्वजारोहण, १०:४५ वाजता धम्म वंदना, ११ वाजता जाहीर सभा व सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रविकांत कदम असणार आहेत तर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, प्राध्यापक डॉ. नंदू हेदुळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर. डांगोमोडेकर, जेष्ठ कार्यकर्ते व्ही. टी. जंगम माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम आधी उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, महिला तालुकाध्यक्ष नेहा काळसेकर, महिला सरचिटणीस समता डिकवलकर, जिल्हा महिला संघटक लीना तळगावकर यांची उपस्थिती असणार आहे.
तरी या कार्यक्रमास मालवण तालुक्यातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार यांनी केले आहे.

rapan bottom