Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आंबेरी गोसावी वाडी येथील श्री भवानी मित्र मंडळ डिचोलकर कुटुंबियांची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव

आंबेरी गोसावी वाडी येथील श्री भवानी मित्र मंडळ डिचोलकर कुटुंबियांची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सव

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मालवण | : मालवण तालुक्यातील आंबेरी गोसावी वाडी येथील श्री भवानी मित्र मंडळ डीचोलकर कुटुंबियांची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात नवरात्रौ उत्सवा निमित्त २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबेरी गोसावी वाडी येथील श्री भवानी माता मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी देवाच्या देव्हाऱ्या जवळ घटस्थापना केली जाते. यात माती मध्ये रुजवना पेरले जाते, आणि नऊ दिवस फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. देवीची नित्य पूजापाठ, आरती, नैवेद्य दरोरोज केला जातो. यात डीचोलकर कुटुंबातील देवीचा उपासक नित्य पूजा पाठ करून नऊ दिवस उपवास धरतो मनो भावे कुलदेवतेची सेवा करतो. गाभाऱ्यात असलेल्या आई भवानी मातेच्या मूर्तीला नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान केल्या जातात. यावेळी आई भवानी देवीच रूप नयन रम्य आणि सुखकारक असत.

पूर्वीच्या काळी डीचोलकर कुटुंबीय एकत्र जमून नित्य पूजा पाठ, घटस्थापना, माळा घालणे, महाप्रसाद, हळदी कुंकू, असा नऊ दिवस छोटेखानी नवरात्र उत्सव करत असत. कालांतराने नव्या चालीरीती व नवीन कास धरत येथील डीचोलकर कुटुंबीय भवानी मित्र मंडळ यांनी २००१ पासून नवरात्री उत्सवात दरोरोज विविध स्पर्धा, संगीत भजन, जागर, गरबा, दांडिया असे कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. त्यामुळे परिसरातील भाविकांची याठिकाणी गर्दी वाढू लागली. मंडळाचे अध्यक्ष विनायक पांडुरंग डीचोलकर, हेमंत डीचोलकर, अमित डीचोलकर, महेश डीचोलकर, मनोज डीचोलकर यांसह अन्य कुटुंबीयांची उपस्थिती असते.
आपल्या गावातील लहान मुलां सहित मोठ्यांना व्यासपीठ मिळाव त्यांना प्रोत्साहन मिळाव आणि गावात एकजूट निर्माण व्हावी यासाठी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. त्याला गावातील लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भवानी देवी मंदिरात वार्षिक नवरात्री, जागर, त्रैवार्षिक गोंधळ, सत्यनारायण पूजा, असे वार्षिक धार्मिक कार्यक्रम होतात. गावात सुमारे २० ते २५ डीचोलकर कुटुंबीयांची घरे असून हा नवरात्री उत्सव मोठ्या श्रद्धेने भक्ती भावाने पार पाडतात. भक्तांच्या नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई भवानी व तिच्या सोबत असलेला श्री महापुरुष देव जागृत आहे. आपल्या लेकरांच्या सुख दुःखा त नेहमी धावून येतो याची प्रचिती साऱ्या भक्तांना आहे म्हणून हे जागृत असे शक्तीस्थान डीचोलकर कुटुंबियांचे कुलदैवत आहे.

rapan bottom