Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण ग्रामीण रुग्णालयात उद्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

मालवण ग्रामीण रुग्णालयात उद्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान…

मालवण | प्रतिनिधी : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान देशभर राबवले जात आहे. या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोमवार २२ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय मालवण येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तज्ञ डॉक्टर टीम यावेळी रुग्णांच्या तपसणीसाठी उपलब्ध असणार आहे. यात डॉ. प्रियांका म्हसकर (स्त्री रोग तज्ञ), डॉ. सुशांता कुळकर्णी (बाल रोग तज्ञ), डॉ. निधी (नेत्र तज्ञ), संतोष सावंत (नाक, कान, घसा तज्ञ), डॉ. शाम राणे (त्वचा रोग तज्ञ), डॉ. समृद्धी कंबले (दंत शल्य चिकित्सक), डॉ. संदीप खुडे (मानसोपचार तज्ञ), डॉ. कपिल दानी (अस्ति रोग तज्ञ), डॉ. दुर्गेश पांडे (जनरल सर्जन) आदी तज्ञ डॉक्टर टीम उपस्थित असणार आहे. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत, रोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा व रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, विशेष तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन होणार आहे. तसेच माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी केली जाणार आहे. तरी सर्व महिलांनी सोबत रेशनकार्ड, आधारकार्ड व आधारलिंक मोबाईल नंबर घेऊन येणे आवश्यक आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ यांनी केले आहे.

rapan bottom