भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण व जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी उपसभापती राजू परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त असरोंडी शाळा नंबर २ येथे आडवली मालडी भाजपच्या वतीने १००० लिटर पाण्याची टाकीची भेट देण्यात आली. शाळेतील पाण्याच्या टाकीवर वडाचे झाड पडून टाकी फुटली होती. ही गोष्ट लक्षात घेवून मुलांच्या पिण्याचा पाण्याची गैरसोय पाहता शाळेच्या आवश्यकतेनुसार भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण व जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. विध्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती अरुण मेस्त्री, सोसायटी अध्यक्ष छोटू घाडीगांवकर, माजी सरपंच अरुण परब, शक्तीकेंद्र प्रमुख आशुतोष सावंत, प्रविण घडिगावकर, भाई घाडीगांवकर, माजी सरपंच महाजन, संजय गावडे, अनिल सावंत, सुनिल असरोंडकर, शिक्षक राणे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुंबई मंडळ अध्यक्ष सावंत यांसह देवयांनी घाडीगांवकर, प्रेरणा सावंत, भावी घाडीगांवकर, जयश्री शिंगाडे, अनिषा पोईपकर, विजय सावंत, भिवा घाडीगांवकर, देवू घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, शिक्षीका गीता भरडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

