स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलम्पिक मध्ये कांस्य पदक
ब्युरो न्यूज : महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ऑलम्पिक 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले आहे. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं.
भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे

