दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र नाणीज येथे सोहळा; सात भाषांमध्ये ॲप उपलब्ध
नाणीज : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी ॲपचे कौतुक करून अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या मंगलप्रसंगी स्वामीजी म्हणाले, “‘सनातन पंचांग’ हे अतिशय सुंदर आणि उपयुक्त ॲप आहे. अधिकाधिक लोकांनी त्याचा वापर करून त्यातील माहितीचा लाभ घ्यावा.” हे ॲप सात भाषांमध्ये उपलब्ध असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे, स्वामीजींनी स्वतःच्या भ्रमणभाषवर हे ॲप तत्काळ डाउनलोड करून घेतले. शुभदिनी स्वामीजींच्या शुभहस्ते लोकार्पण झाल्याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या वेळी ‘सनातन पंचांग’ समूहाचे श्री. गोविंद भारद्वाज, सौ. दीपा औंधकर, सौ. शुभांगी मुळ्ये आणि श्री. हनुमंत करंबेळकर उपस्थित होते.
सात भाषांमध्ये ॲप उपलब्ध
‘सनातन पंचांग’ हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू आणि तमिळ अशा सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉइड प्रणालीवर हे ॲप ४१ लाखांहून अधिक, तर आयओएस प्रणालीवर ७ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
धार्मिक आणि दैनंदिन माहितीसाठी उपयुक्त
‘सनातन पंचांग’ ॲपमध्ये शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्यविषयक टिप्स, सुविचार आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली विविध माहिती उपलब्ध आहे. संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना, दिनविशेष, होमस्क्रीन विजेट आणि रिमाइंडर यांसारख्या सुविधांचाही त्यात समावेश आहे.भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक आचार-विचार यांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी नागरिकांनी स्वतःसह नातेवाइक, मित्रपरिवार, शेजारी आणि कार्यालयीन सहकाऱ्यांनाही हे ॲप डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. ॲप डाउनलोड लिंक :https://sanatanpanchang.com/download-apps/
संपर्क : श्री. निनाद गाडगीळ — ८६५२०९०३९८
▪️अमित खोत | मालवण

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ मराठी ॲपचे लोकार्पण
