Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जागतिक स्वच्छता दिन निमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियान : जिल्हाधिकारी यांचाही स्वच्छता मोहिमेत सहभाग

आचरा | : प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळल्यास ती कृती मोलाची ठरेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वापरातील प्लास्टिक वापर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्नाशील राहूया. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आचरा येथे बोलताना व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने मालवणसह किनारी भागात मोठया प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातूनही प्लास्टिक कचरा वाढणार नाही याबाबतही जनजागृती महत्वाची आहे. प्रशासन स्तरावरूनही आवश्यक उपाययोजना केल्या जात असून त्यात अधिक व्यापकता आणली जाईल. मात्र प्लास्टिक कचरा मुक्ती साठी सर्वांचे योगदान आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन निमित्त राष्ट्रीय किनारा अभियान राबवले जात आहे. या अनुषंगाने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम अंतर्गत मालवण तालुक्यातील आचरा ते देवबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आचरा समुद्र किनारी करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सहभागी होत जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल आदी कचरा उचल प्राधान्याने केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, परिसर स्वच्छता, ग्राम स्वच्छता याबाबत प्रत्येकाने जागरुक असणे आवश्यक आहे. वाढती प्लास्टिक कचरा समस्यां आपल्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे याचा विचार आपण सर्वांनी करूया. प्लासिक वापर शून्य करूया. असेही आवाहन त्यांनी केले.दरम्यान, वाढत्या कचरा समस्या निराकरणासाठी ग्रामपंचायतींवर पर्यटन हंगामात ताण वाढतो. यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समिती विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट प्रतिनिधी, शालेय विध्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा समुद्र किनारी राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी,
आचरा ग्रामपंचायत, शालेय विध्यार्थी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोठया प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom