Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

अप्पर जिल्हाधिकारी शुभागी साठे यांची सुकळवाड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला भेट

अप्पर जिल्हाधिकारी शुभागी साठे यांची सुकळवाड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला भेट

प्रेरणा दिनाचे औचित्य : विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रगती साधा

सिंधुदुर्ग | : आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, विविध राष्ट्रीय प्रज्ञाशोध, अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज अशा उपक्रमांमधून आपले आत्मज्ञान वाढवावे. ध्येय, जिद्द आणि चिकाटी यांचा आधार घेतल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात उत्तुंग यश संपादन करू शकतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभागी साठे यांनी केले. सुकळवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ‘प्रेरणा दिना’च्या औचित्याने श्रीमती साठे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक बाळकृष्ण नांदोस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी शाळेची पटसंख्या, लोकवर्गणीतून होत असलेले उपक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान, सेवा पंधरवडा अशा विविध योजनांची माहिती दिली. गावचे उपसरपंच किशोर पेडणेकर यांनीही शाळेला मिळणारे गावकऱ्यांचे सहकार्य अधोरेखित केले.

श्रीमती साठे म्हणाल्या, गेल्या जूनमध्ये मी या शाळेला भेट दिली होती. आज प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुन्हा आले आहे. शाळेतील उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि गावकऱ्यांचे सहकार्य हे स्तुत्य आहे. सामाजिक दृष्टी ठेवून हे सहकार्य सातत्याने मिळाले, तर सुकळवाड शाळा केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही उत्तुंग क्रमांक पटकावेल असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाताडे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom