आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन निमित्त "राष्ट्रीय किनारा अभियान"
जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांची प्रमुख उपस्थिती : गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांची माहिती
मालवण | : आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिना निमित्त "राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत" समुद्र किनारा स्वच्छता मोहिम २० सप्टेंबर २०२५ रोजी मालवण आचरा ते देवबाग या समुद्र किनारी राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या किनारा स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता आचारा समुद्र किनारी होणार आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी दिली.
"राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत" समुद्र किनारा स्वच्छता मोहिम जिल्हास्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी राज्यस्तरीय किनारा स्वच्छता मध्ये मालवण आचरा व देवबाग या बीच चा समावेश करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून आचरा येथे गट शिक्षणाधिकारी संजय माने तर देवबाग येथे बांधकाम उपअभियांत संतोष सावर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशा नुसार आचरा ते देवबाग किनाऱ्य वरील सर्व ग्रामपंचायतीनी स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले आहे. यासाठीवायगंणी, तोंडवळी, रेवंडी, सर्जेकोट मिर्याबांदा, कोळंब, वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग गावातील सरपंच यांनी नियोजन केले आहे. येथील प्रत्येक बिचवर बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थांनी मिळून प्रत्येक बिचवर सुमारे २०० ते ३०० ग्रामस्थांचा समूह एकत्र येऊन स्वच्छता मोहीम यशस्वी करणार आहेत.
तालुका पर्यवेक्षक राजेंद्र सुर्यकांत रणसिग, सुधिर गायकवाड, सुरज बांगर, विनायक कृ. जाधव, श्रीकृष्ण गजानन सावंत, सुनिल चव्हाण, उदय दिक्षीत विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य स्तरीय नोडल शैलेन्द्र यादव यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जयप्रकाश परब हेही उपस्थित राहणार आहेत.

