ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते शेत पायवाटा पाणंद रास्ते या अभियानातंर्गत; पायवाट शासन दरबारी वर्ग/नोंद.
ग्रामपंचायत कांदळगाव व महसूल विभागाचे मोलाचे सहकार्य
मालवण | : ग्रामपंचायत कांदळगाव व महसूल विभागाच्या वतीने कांदळगांव हद्दीमध्ये कांदळगाव रामेश्वर मंदिर स्मशानभूमी मुख्य रस्ता ते पाताडे वाडी पाताडे मुख्यघर ते सुधाकर राणे यांच्या शेती पर्यंत जाणारी पायवाट शासन दरबारी वर्ग/नोंद करणेसाठी ग्रामपंचायतीने व महसुल विभागाने महत्वाची जबाबदारी घेतली. सदरची पायवाट ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते शेत पायवाटा पाणंद रास्ते या अभियानातंर्गत जिल्हयात शासन दरबारी नोंद करणेस प्रथम ठरली आहे.

सदर पायवाट होणेसाठी गेली सन १९९५ पासून त्या वाडीतील ग्रामस्य प्रतिक्षेत होते. गेली चाळीस वर्षांची ग्रामस्थानची झालेली गैरसोय दूर झालेली असून वाडीतील ग्रामस्थांनी जमिन मालक त्याच प्रमाणे ग्रामपंचायत व महसुल विभागाचे आभार व्यक्त केले.या पायवाटेला श्री. सुधाकर घनश्याम राणे, राघोबा घनश्याम राणे, यांचे पुतणे. श्री धर्मेश अरविंद राणे यांनी सदर शेत पायवाटे साठी विनामोबदला जागा दिलेली आहे.
या वेळी मालवण तालुका गट विकास अधिकारी श्याम चव्हाण, कोळंब सर्कल चव्हाण (पिंगुळकर मॅडम'),मुख्यमंत्री समृद्ध अभियान संपर्क अधिकारी श्री. प्रशांत पारकर,सरपंच श्री रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम, ग्रा.पं.सदस्य अनघा कदम, श्री.संतोष पारकर, तलाठी शिंदे, ग्रा.पं. कर्मचारी आशिष आचरेकर, श्री. गजानन सुर्वे, महसूल कर्मचारी वैभव मसुडगे, व ग्रामस्थ उपस्थित होते. गावच्या सार्वजनिक प्रत्येक बाबींसाठी विनामोबदला जमीन देणारे दानशूर व परोपकारी व्यक्तीमहत्व श्री सुधाकर घनश्याम राणे व त्यांचे संपूर्ण कुटुंब, यांचे ग्रामपंचायत कांदळगावच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

