मसुरे | : मालवण तालुका मसुरे पंचायत समिती भारतीय जनता पक्षाची बैठक मोठया प्रतिसादात संपन्न झाली. आगामी जिल्हापरिषद निडणुका ताकदीने जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच भाजपा प्रदेश अधक्ष रविंद्र चव्हान याच्या निवडीच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच मालवणात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. याचाही आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह पदाधिकारी उपस्थितीत होते.


