Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग नूतन कार्यालयीन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग नूतन कार्यालयीन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्ग | : सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन कार्यालयीन इमारत आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली झाली असून तिचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नवीन कार्यालयीन इमारत सुसज्ज, प्रशस्त आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या वेळेत पूर्ण झाल्यामुळे ती स्थानिकांसाठी आदर्श ठरली आहे. या इमारतीतून पारदर्शक कारभार व्हावा, नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जाव्यात तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, ही कार्यालयीन इमारत जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. म्हणूनच येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य मानावे.नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे व उत्तरदायित्व जपणारे कार्यालय म्हणून या इमारतीतून नवा इतिहास घडावा, असेही ते म्हणाले.

तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज जिल्हावासीयांना थेट फायदा होत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे गावोगावी दळणवळण सुलभ झाले असून विकासाच्या प्रक्रियेला नवी गती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक विश्रामगृहांची दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. याशिवाय, दोडामार्ग येथे नवीन विश्रामगृह उभारणीसाठी निधी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करून प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी जनतेच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी प्रभाकर सावंत तसेच कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या प्रसंगी कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार श्रीमती राजमाने,पी. एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर, कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

rapan bottom