Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

बजरंग दलचे कौतुकास्पद सेवाकार्य!

बजरंग दलचे कौतुकास्पद सेवाकार्य!

मालवण समुद्र किनारी खडकात अडकून पडलेल्या बैलाची सुटका

मालवण | : मालवण येथील चिवला बीच कुरण परिसरात समुद्री खडकात पाय घसरून एक बैल पडला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. माहिती मिळताच लगेचच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली बजरंग दल सदस्य, नागरिक यांनी बचावकार्य करत बैलाची सुखरूप सुटका केली. बैल खोल खडकात अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड होते. मात्र जेसीबी च्या सहाय्याने व स्थानिकांच्या मदतीने बजरंग दलाने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

भर पावसातही विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचे सेवा कार्य सुरूच होते. या मोहिमेत जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, मालवण संयोजक गणेश चव्हाण व गोरक्षक पार्थ डीचवलकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मदतीस धाव घेतली. बजरंग दल हे “सेवा, सुरक्षा आणि संस्कार” या कार्यांसाठी ओळखले जाते. यावेळी कार्यकर्त्यांनी आवाहन केले की, “नव्या तरुणांनी आपली संपूर्ण शक्ती हिंदू राष्ट्र रक्षणासाठी एकत्र आणली पाहिजे.”

या बचाव मोहिमेत प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, ललित चव्हाण, उत्कर्ष मांजरेकर (धुरीवाडा ग्रामस्थ), विशाल गोवेकर, चेतक पराडकर, शेखर खोरजे, महेंद्र माणगावकर, प्रेम वेंगुर्लेकर, यश घाडीगावकर (मालवण नगरपालिका), पवार साहेब, वळंजू मुकादम यांचे सहकार्य लाभले. तसेच JCB चालकाचे मोलाचे योगदान मिळाले. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत व त्यांचे सहकारी अल्पेश वराडकर देखील उपस्थित होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बैलाची यशस्वी सुटका झाली. स्थानिक नागरिकांनी बजरंग दलाच्या या तत्परतेचे व सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.

फोटो : मालवण समुद्र किनारी खडकात अडकून पडलेल्या बैलाची बजरंग दल व नागरिक यांच्या प्रयत्नातून सुटका. (अमित खोत, मालवण)

rapan bottom