मंदिरात विविध धार्मिक -सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण | : कुंभारमाठ येथील जागृत देवस्थान श्री देवी जरीमरी मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे नवरात्रौत्सवा निमित्ताने मंदिरात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वा. देवीचा अभिषेक, दुपारी १२.३० वा.देवीची आरती,दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायं ७ वा.देवीची आरती, असे नियमित कार्यक्रम होणार आहेत.
देवीचा जागर भक्तिमय वातावरणात व्हवा यासाठी पंचक्रोशीतील भजनी बुवाची संगीत भजने दरोरोज रात्री ८ वा. होणार आहेत. यात पाहिला दिवस श्री वावडी देवी प्रसादिक भजन मंडळ,आनंदव्हाळ बुवा-श्री शरद सावंत,दुसरा दिवस-श्री कुलस्वामिनी प्रसादिक भजन मंडळ,खालची देवली बुवा- श्री मधुसूदन चव्हाण,तिसरा दिवस- श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव कातवड बुवा- श्री मंगेश नलावडे,चौथा दिवस -श्री आदर्श संगीत विद्यालय मालवण श्री बंटी वराडकर,पाचवा दिवस- श्री भवानी प्रसादिक भजन मंडळ वस्त वाडी बुवा श्री चंदू वस्त,सहावा दिवस- श्री ब्राह्मण देव भजन मंडळ,काळेथर पिरखोली बुवा-श्री संदेश परकर,सातवा दिवस श्री घुमडाई भजन मंडळ, घुमडे मालवण बुवा श्री नाना सामंत, आठवा दिवस संगीत भजन,नववा दिवस संगीत भजन,दहावा दिवस,श्री आकारी ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ, कातवड बुवा श्री चेतन धुरी, या भजनी मंडळाची रंगीत संगीत भजन होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जरीमरी देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

