वायरी लुडबेवाडा कुलस्वामिनी तुळजा भवानी मंदिरात धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण | : वायरी लुडबेवाडा येथील कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिरात नवरातौत्सवा निमित्त सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ ते बुधवार दि १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी - देवीची षोडशोपचार पूजा व आरती, रोज संध्याकाळी ७.३० वा.महा आरती होणार आहे.
सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. श्री. महेश धामापूरकर विषय- आई तुळजाभवानी, मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. कु. वेदिका लुडबे, वायरी विषय-संत गोरा कुंभार,बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. सौ. मेधा शेवडे विषय संत कान्होपात्रा, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. श्री. विनोद सातार्डेकर विषय- स्वामी भक्त बाळाप्पा, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा. कीर्तन जोगवा व गोंधळ प्रा. हरिभाऊ भिते आणि श्रीधर पाचंगे कणकवली, शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा समईनृत्य, रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन हभप. श्री. प्रभुदास आजगावकर विषय समर्थ मातृभेट रामदास स्वामी, सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. श्री. अक्षय परुळेकर विषय- गरुड महात्म्य व नागपंचमीची कथा,मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. श्री. रामचंद्र मेस्त्री विषय - महिषासुर मर्दिनी, बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ सायं. ७.४५ वा कीर्तन ह.भ.प. श्री. अक्षय सातार्डेकर विषय - संत मुक्ताई. या कीर्तनासाठी संगीत साथ तबला- श्री. सुधीर गोसावी ऑर्गन - श्री. अक्षय सातार्डेकर यांची लाभणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आई तुळजा भवानी मंदिर मंडळ वायरी, लुडबेवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

