Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे

सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग |: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली. पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ३७ प्रलंबित वीजजोडण्या चालू महिन्याच्या अखेरीस म्हणजेच सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण कराव्यात. नागरिकांच्या सोयीसाठी व संपर्कव्यवस्थेच्या मजबुतीसाठी हे काम प्राथमिकतेने पूर्ण व्हावे असेही ते म्हणाले.

या बैठकीत बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोबाईल टॉवर वीजजोडणी स्थितीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ पैकी ६६ टॉवर ठिकाणी वीज जोडणी मिळाली असून, उर्वरित ३७ ठिकाणी काम प्रलंबित आहे. उर्वरित टॉवरवर वीज जोडणी का प्रलंबित आहे? त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देताना सांगितले की, ज्या ठिकाणी नवीन रोहित्र (Transformer) बसविण्याचे काम आहे, तेथेच विलंब झाला आहे. ही कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कुडाळचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, कणकवलीचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी तसेच बी एस एन एल चे अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom