सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
मालवण | : मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ सप्टेंबरला सायंकाळी ४.३० वाजता कोकणातील मान्यवर कवींची तुफानी काव्यमैफिल, २० ला सायंकाळी ६.३० वाजता सवाल-जवाबाची संगीत भजनबारी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे, राजापूर (बुवा - संतोष शिरसेकर, पखवाज- अजित शिरसेकर, तबला- सौरभ भोगले) विरुद्ध श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी- मालवण (बुवा-भालचंद्र केळुसकर, पखवाज - विशाल केळुसकर, तबला - पंकज पाटील ) यांच्यात ही भजनबारी रंगणार आहे.
२७ ला सायंकाळी ९.३० वाजता श्री बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग, २ ऑक्टोबर ला रात्री ९ वाजता ह.भ.प. नेहा उपाध्ये (म्हापसा, गोवा) या 'गजेंद्रमोक्ष' या विषयावर कीर्तन, ३ रोजी रात्री ह. भ. प. संदीप मांडके (पुणे) हे 'रामभक्त केवट' वर कीर्तन, ४ ला ह. भ. प. अक्षय घांग्रेकर (भिवंडी) हे 'दूधभात शिक्षा' वर कीर्तन सादर करणार आहेत. ५ ला ह.भ.प. केशव शिवडेकर (कपिलेश्वरी, गोवा) 'जामिनाचा धोंडा' वर कीर्तन, ६ रोजी ह. भ. प. हरिहर नातू (मालवण) हे 'श्रीकृष्ण शिष्टाई' वर कीर्तन सादर करणार आहेत. ९ रोजी श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा दशावतार होणार आहे. ११ ला ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक चलचित्र देखाव्यासहित विसर्जन मिरवणूक निघून गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे.

