नवरात्रोत्सवा निमित्त भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे आयोजन
मालवण | : मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. याचा शुभारंभ नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी २२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता होणार आहे. सलग अकरा दिवस जिल्ह्यातील नामवंत डबलबारी भजनांच्या बुवांकडून भजन सेवा करण्यात येणार आहे. दसऱ्याला २ ऑक्टोबर रोजी सोहळ्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे नेते विजय शिवा चव्हाण यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्याहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण हे भूषविणार आहेत. या उत्सवाचे यावर्षी १३ वे वर्ष आहे. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, विजय केनवडेकर, प - दीप मुंबरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाचे पहिले पुष्प २२ रोजी आई तुळजा भवानी ढोलकी भजन मंडळाचे बुवा राजा लुडबे गुंफणार आहेत. २३ रोजी देवकीमाता मंडळ ( बुवा - सिद्धेश पाताडे), २४ रोजी भद्रकाली मंडळ ( बुवा - सिद्धेश कांबळी), २५ रोजी ब्राह्मण देव भजन मंडळ (बुवा - शामसुंदर आचरेकर ), २६ रोजी बाल दांडेश्वर भजन मंडळ ( बुवा - उत्कर्ष आचरेकर ), २७ रोजी आकारी ब्राह्मण मंडळ ( बुवा - चेतन धुरी ), २८ रोजी ब्राह्मण देव भजन मंडळ ( बुवा - पप्पू सामंत), २९ रोजी ब्राह्मणदेव मंडळ, कातवड (बुवा-मंगेश नलावडे), ३० रोजी ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ ( बुवा - देवेश धुरी), १ ऑक्टोबर घुमडाई सातेरी भजन मंडळ ( बुवा - नाना सामंत), रोजी २ रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ ( बुवा - सुनील परुळेकर).
या उत्सवात इतरही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम भैरवी मंदिरात होणार आहेत. भाविक आणि भजन रसिकांनी या भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

