Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मालवणात सेवा सप्ताह..!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मालवणात सेवा सप्ताह..!

बाबा मोंडकर ; शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

मालवण | : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा सप्ताह' साजरा करण्याचे ठरवले आहे. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फोवकांडा पिंपळ येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, मंदार केणी, केदार झाड, बबलू राऊत, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, बाबू मांजरेकर, प्रमोद करलकर, पूजा करलकर, रवींद्र खानविलकर, रश्मी लुडबे, ललित चव्हाण, श्याम झाड, मुन्ना झाड, कॅलिस फर्नांडिस, मोहन कुबल आणि दिलीप सांगवेकर, आबा मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण ग्रामीण रुग्णालयात औषध आणि रुग्णांना फळवाटप करून सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सेवा सप्ताहात मालवण शहर व तालुक्यातील ३२ प्रभागांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, आणि युवा वर्गासाठी विविध कॅम्प्सचा समावेश आहे.
याच सेवा सप्ताहाचा भाग म्हणून २० सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे आयुष्मान भारत आणि आयुष्मान वयोवंदन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.
या योजनांविषयी माहिती देताना मोंडकर म्हणाले की, या कार्डचा लाभ ७० वर्षांवरील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. त्याचे उत्पन्न कितीही असले तरी त्याला हे कार्ड दिले जाईल. या कार्डमुळे वर्षासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतील. हे कार्ड काढण्यासाठी ७० वर्षांवरील व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन येणे गरजेचे आहे.
या शिबिरात रक्तदाब आणि मधुमेह यांची तपासणी केली जाणार आहे, तसेच मोफत औषधांचे वाटपही केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामान्य आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले.

rapan bottom