स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व वराडकर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कट्टा येथे आयोजन
मालवण | : मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी बाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रहेमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांची टीम मालवण येथे गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मर्चंट नेव्ही वरील मोफत मार्गदर्शन शिबिर घेणार आहे.दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत मागील दोन वर्षांत अशाच विद्यार्थी मार्गदर्शनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले होते. त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या मर्चंट नेव्हीमध्ये दाखल झाले आहेत. याच धर्तीवर यावर्षी देखील हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना पुढील विषयांवर माहिती दिली जाणार आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे काय?,प्रवेशासाठी आवश्यक पात्रता व प्रशिक्षण प्रक्रिया.,प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी.महासागरावर मोठ्या जहाजांवरील राहणीमान. मर्चंट नेव्हीमुळे जगभर प्रवास करण्याची संधी. याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्गदर्शनासाठी कॅप्टन मकरंद सरदेसाई (फॅकल्टी – बी.एस्सी. नॉटिकल सायन्स), श्री. अश्विन देशमुख (कॉम्प्युटर सायन्स), श्री. प्रमोद म्हात्रे (प्लेसमेंट ऑफिसर) आणि कु. नियती पाटील उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबिराचे आयोजन वराडकर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कट्टा येथे गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. म्हणूनच सर्व दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्नर कौन्सिल सदस्य श्री. विजय केनवडेकर यांनी केले आहे.

